नाशिक शहरातील कामटवाडे भागात ‘धनुर्वात आणि घटसर्प’ लशीचा बूस्टर डोस घेतल्यानंतर श्रावणी पाटील (वय १७) या मुलीचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने डिप्थीरिया आणि टिटानस या औषधांच्या ठरावीक बॅचवर आता संपूर्ण राज्यात तातडीने बंदी घातली आहे. राज्यातील सर्व शासकीय आरोग्य केंद्रांना लस वापरू नये, अशी सूचना जारी करण्यात आली आहे.
राष्ट्रीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी नमुने पाठवले
राज्यात या विशिष्ट बॅचच्या एकूण १,६३२ लस बाटल्या वितरित केल्या होत्या. त्यापैकी १,३६० बाटल्यांचा वापर झाला आहे. मात्र, नाशिकमधील गंभीर घटनेनंतर उर्वरित २७२ बाटल्या तत्काळ परत मागवण्यात आल्या आहेत. तसेच लस देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट सिरिंज, इंजेक्शनच्या एकूण १ लाख ३७ हजार ६०० इंजेक्शन वितरित झाली. त्यापैकी १ लाख ११ हजार २०० इंजेक्शनचा वापर झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी आणि तपासणीसाठी सुमारे ८०० नमुने केंद्रीय औषध प्रयोगशाळा, कसौली (हिमाचल प्रदेश) येथे पाठवण्यात आले आहेत. श्रावणीला ज्या बाटलीतून डोस देण्यात आला, त्याच बाटलीतून अन्य पाच जणांनाही डोस देण्यात आला होता. मात्र, त्या पाचही जणांवर विपरीत परिणाम झालेला नाही. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी लस आणि इंजेक्शन या दोन्ही घटकांचे नमुने कसौली येथील राष्ट्रीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
तीव्र ॲलर्जिक प्रतिक्रियेमुळे मृत्यू?
श्रावणी पाटील हिचा मृत्यू तीव्र ॲलर्जिक प्रतिक्रियेमुळे झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने काढला आहे. धनुर्वात आणि घटसर्प प्रतिबंधक लशीनंतर श्रावणीचा मृत्यू झाला किंवा कसे याचे सविस्तर कारण शोधण्यासाठी मुलीच्या त्वचेचे, रक्ताचे नमुने; तसेच व्हिसेरा नाशिक व छत्रपती संभाजीनगर येथील फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.