2005 आधी छापलेल्या ₹10, ₹20, ₹50 च्या नोटा बंद होणार? खरं काय ते सरकारनंच सांगितलं

बातमीसाठी वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या आणि संकेतस्थळांवर अनेक मंडळी अवलंबून असली तरीही काही मंडळी मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातूनच बातम्या मिळवतात, वाचतात आणि त्यावर चर्चासुद्धा करतात. पण, सोशल मीडियावर केली जाणारी प्रत्येक पोस्ट खरी बातमीच असते असं नाही. अनेकदा काही फसवे मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. असाच एक मेसेज गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. ज्यामध्ये 2005 पूर्वी छापलेल्या ₹10, ₹20, ₹50 आणि 100 रुपयांच्या नोटा जुलै महिन्यापासून बंद होणार असा दावा करण्यात आला होता.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत चिन्हासह हा मेसेज व्हायरल केला जात होता. ही जरी एखादी सरकारी नोटीस वाटत असल्यानं सोशल मीडियावरील या पोस्टनंतर अनेक नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळालं. इतकंच नव्हे, तर नागरिकांमध्ये पुन्हा एकदा नोटबंदीच्या चर्चा सुरू झाल्या. आरबीआयनं खरंच असा कोणता निर्णय घेतला आहे का? की ही फक्त एक अफवा आहे? हाच प्रश्न अनेकांनी विचारला.

सरकारनं सगळंच सांगितलं…

सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या या दाव्यासंदर्भात सरकारनं बरीच माहिती दिली. ही पोस्ट फसवी असून, बँक ऑफ महाराष्ट्रनं अशी कोणतीही सूचना जारी केली नसल्याचं प्रेस इनफॉरमेशन ब्यूरो (PIB)नं स्पष्ट केलं आहे. हा दावा पूर्णपणे खोटा असून त्यास कोणताही आधार नसल्याचं स्पष्च केलं. सरकार किंवा आरबीआयनं नोटांसंदर्भात असा कोणताचस निर्णय घेतला नसल्याचं पीआयबीनं स्पष्ट केलं.

सोशल मीडियावर जारी होणारा हा मेसेज पाहता बँक ऑफ महाराष्ट्रनंसुद्धा हा मेसेज फसवा असल्याचं सांगत दिली जाणारी माहिती तथ्यहीन असल्याचं स्पष्ट केलं. असे कोणतेही मेसेज किंवा पोस्टवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे मेसेज फॉरवर्ड करू नये असंही बँकेनं स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *