विठोबाची दर्शन रांग 24 तास नाही, वारकरी संघटनापुढे मंदिर प्रशासन नमलं

विठोबाची दर्शन रांग 24 तास नाही, वारकरी संघटनापुढे मंदिर प्रशासन नमलं

यंदा वारीदरम्यान विट्ठलाच्या दर्शनाची रांग 24 तास सुरु ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने अखेर मागे घेतला आहे. त्यामुळे आता 24 तासांऐवजी रात्री अडीचपर्यंतच दर्शनाची मुभा असेल.

दर्शन रांग 24 तास सुरु ठेवू नये, यासाठी काही वारकरी संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यासाठी शनिवारी पंढरपूर बंदचीही हाक देण्यात आली होती. त्यामुळे मंदिर प्रशासनाने आपला निर्णय बदलत वारकऱ्यांच्या मागण्या काहीशा मान्य केल्या आहेत.

आषाढी वारीनिमित्त लाखो भाविक पंढरीत येतात. त्या सर्वांना दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर प्रशासनानं 24 तास दर्शन रांग सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *