पाटण्यात बोअरवेलमध्ये पडलेल्या पाच वर्षाच्या मुलीला पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले परंतू तिला वाचविण्यात अपयश आले आहे.
पाटण्यातील मित्र मंडळ कॉलनीमध्ये रविवारी सकाळी ५० फूट खोल बोअरमध्ये पाच वर्षाची मुलगी पडली होती. पाच तासानंतर तिला बोअरमधून काढण्यात आले. त्यावेळी ती जीवंत होती.
तात्काळ तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू तेथे तिची तब्बेत अधिक बिघडल्याने तिला वाचविण्यात डॉक्टरांना अपयश आले.

