14 वर्षांपासून भुकेलेले सत्तेत आले, राज ठाकरेंची भाजपवर घणाघाती टीका

14 वर्षांपासून भुकेलेले सत्तेत आले, राज ठाकरेंची भाजपवर घणाघाती टीका

कोकण दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. “गेल्या 14 वर्षांपासून सत्तेपासून दूर असलेले भुकेलेले आता सत्तेवर आले आहेत. हे हातपाय मारणारच. इतक्या कमी वेळेत अधिक भ्रष्टाचार केला.” असं म्हणत राज ठाकरेंनी भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

“तसेच या सरकारचा कुणावरही धाकच राहिला नसून प्रत्येक जण आपल्या मर्जीप्रमाणं वागतो. अधिकारी, मंत्री, सरकारी दवाखाने कोणालाही भीती उरलेली नाही.” असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांनी भाजपवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केल्यामुळे आता या टीकेला भाजप आता काय उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *