जान्हवी गडकरचा जेलमधील मुक्काम वाढला, कुर्ला कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

जान्हवी गडकरचा जेलमधील मुक्काम वाढला, कुर्ला कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणी अटकेत असलेल्या जान्हवी गडकरचा तुरुंगातील मुक्काम आणखी 14 दिवसांनी वाढला आहे. कुर्ला कोर्टाने आज जान्हवी गडकरचा जामीन अर्ज फेटाळल्याने तिला 10 जुलैपर्यंत तुरुंगातच राहावं लागणार आहे.

चेंबुर परिसरात 8 जून रोजी ऑडी गाडीच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला होता. तर चार जण जखमी झाले होते. जान्हवी गडकर मद्यपान करुन गाडी चालवत होती, असंही तपासणीत समोर आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी जान्हवीला अटक केली होती.

जान्हवीला 26 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आज या कोठडीची मुदत संपल्यामुळे तिच्या वकिलांनी जामीनासाठी अर्ज केला. मात्र तो अर्ज कुर्ला कोर्टाने फेटाळला आणि तिच्या न्यायालयीन कोठडीत 10 जुलैपर्यंत वाढ केली. त्यामुळे जान्हवी गडकरला आणखी काही दिवस तुरुंगाची हवा खावी लागार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *