मर्द राज पुरोहितांचे मन:पूर्वक अभिनंदन!, जितेंद्र आव्हाडांकडून पुरोहितांचं स्वागत

मर्द राज पुरोहितांचे मन:पूर्वक अभिनंदन!, जितेंद्र आव्हाडांकडून पुरोहितांचं स्वागत

भाजपचे आमदार राज पुरोहित यांनी राज्याच्या नेतृत्वापासून केंद्राच्या नेतृत्वावर तोंडसुख घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुरोहित यांच्या अभिनंदनाचे ठाण्यात होर्डिंग लावले आहेत.

स्टिंग ऑपरेशनमधून भाजपच्या नेत्यांवर पुरोहित यांनी चांगलीच टीका केली आहे. “आम्ही जे बोलू शकलो नाही, ते तुम्ही बोलून दाखवले. मर्द राज पुरोहितांचे मन:पूर्वक अभिनंदन. राज पुरोहित तूम आगे बढो, हम तुम्हारे साथ है.” असं या होर्डिंगवर लिहण्यात आलं आहे. तसेच या होर्डिंगखाली जितेंद आव्हाडांचे नाव ठळक अक्षरात लिहलं आहे.

होर्डिंगच्या माध्यमातून आव्हाड यांनी भाजपला चांगलच टार्गेट केलं आहे. त्यामुळे राज पुरोहित यांच्या वक्तव्यामुळे भाजप चांगलीच अडचणीत आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *