पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी!

पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी!

मुंबईत रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे आणि जागोजागी साचलेल्या पाण्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील पालिकेच्या शाळाबरोबरच इंग्रजी माध्यमातील अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. मुंबईतील अनेक शाळा या नेहमीप्रमाणे सकाळीच भरल्या होत्या परंतू अवघ्या काही मिनिटात सततच्या पावसामुळे शाळा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांना घरी जाण्यास सांगितले. दरम्यान, येत्या २४ तासांत अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्यानं असल्यानं ही शक्‍यता लक्षात घेऊन मुंबईतील सर्व शाळा आज बंद ठेवण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजेय मेहता यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *