बोरीवलीमध्ये रेल्वेत चढताना तोल जाऊन एक महिला रेल्वे कोच आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकली. बोरीवली स्टेशनच्या प्लॅटफॉर्म 6 वर ही घटना घडली आहे. या घटनेत सुदैवाने महिला बचावली आहे.
बोरीवलीच्या प्लॅटफॉर्म 6 वर उभ्या असलेल्या सौराष्ट्र जनता एक्स्प्रेसमध्ये चढताना महिला कोच आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकली. रविवारी संध्याकाळी 6 वाजता हा प्रकार घडला. तिला बाहेर काढण्यासाठी आरपीएफ, हमाल आणि काही प्रवाशांनी कोचखाली उतरुन खेचून बाहेर काढलं. या घटनेत महिलेचा जीव वाचला असला तरी तिला दुखापत झाली आहे.महिलेला वाचवण्यासाठी आरपीएफ जवान कोचखाली उतरले असताना प्लॅटफॉर्म 5 वरुन जलद ट्रेन जात होती. यावेळी प्रसंगावधान राखत एका प्रवाशाने पुढे जाऊन ती ट्रेन थांबवल्यामुळे दुर्घटना टळली.
