औरंगाबादच्या बैठकीत मराठा मोर्चासाठी राज्यव्यापी समिती स्थापन

औरंगाबादमध्ये काल मराठा क्रांती मोर्चा समिती स्थापन करण्यात आली. संपूर्ण राज्यातून समन्वय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रत्येक जिल्ह्यातून 11 जणांना निमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीत चर्चेनंतर सर्वानुमते एक राज्यव्यापी समिती तयार करण्यात आली.

आजवर मराठा मोर्चांना कोणतेही राजकीय नेतृत्व नव्हते किंवा कोणताही राजकीय चेहरा नव्हता. त्यामुळे आता ही समिती स्थापन झाल्यानं या समितीला आपल्या मागण्या सरकारसमोर मांडून सरकारशी चर्चा करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *