मांढरदेवीच्या दर्शनासाठी गर्दी

नवरात्रोत्सवामध्ये मांढरदेवी (ता. वाई) येथे काळूबाईदेवीच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत. शुक्रवारी नवरात्रोत्सवाची सातवी माळ पाहण्यासाठी भक्तांची मोठी रांग लागली होती.

नवरात्रीमुळे मांढरगडावर काळुबाईदेवीचा जागर सुरु आहे. नवरात्रोत्सवाची सातवी माळ असल्याने गुरुवारी रात्रीपासून मांढरदेव डोंगरावर भाविक येत होते. तर शुक्रवारी दुपारच्या सुमारास भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने दर्शनाची रांग महाव्दाराच्या खाली आली होती. हार, नारळासह भाविक काळूबाईची ओटी भरत होते.

भाविकांची होणारी प्रचंड गर्दी गृहित धरुन देवस्थान ट्रस्टतर्फे नेटके नियोजन करण्यात आले होते. तसेच पोलीस कर्मचारी, होमगार्ड, कमांडो अ‍ॅकॅडमीचे स्वयंसेवक बंदोबस्तासाठी तैनात होते. याबरोबरच भाविकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य पथकाही नेमण्यात आले होते.  देवस्थान ट्रस्टच्यावतीने यावर्षी प्रथमच वॉकी-टॉकीचा वापर करण्यात आला.

भाविकांची गर्दी वाढल्याने वाहतुकीचीही कोंडी झाली होती. यामुळे बराचवेळ भाविकांना तात्कळत रहावे लागले. देवीची पूजा पुजारी संजय गुरव यांनी बांधली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *