दोन कोटी वर्षांपूर्वीच्या शार्कच्या प्रजातीचा शोध

समुद्रात कोट्यवधी प्रकारचे जलचर राहतात. यातील काही प्रजाती तर कोट्यवधी वर्षांपूर्वीच्या आहेत. अशाच एका दोन कोटी वर्षांपूर्वीच्या शार्क माशाच्या प्रजातीचा संशोधकांनी शोध लावला आहे. हे शार्क लुप्त झालेल्या ‘सुपर प्रिडेटर मेगालोडोन’ (मोठे दात आणि मोठ्या आकाराचे) प्रजातीशी संबंधित आहेत.
पूर्व आणि पश्‍चिम अमेरिका (कॅलिफोर्निया, उत्तर कॅरोलिना), पेरू आणि जपानी समुद्रात 4.5 सेंटिमीटर लांब दाताचे जीवाश्म संशोधकांना आढळून आले. हाच शोध संशोधनासाठी मोठा आधार ठरणारा आहे. ‘मेगालोडोन पॅराडॉक्सोडॉन’ नावाच्या प्रजातीचे शार्क माशांचे अस्तित्व मध्ययुगीन ‘माईअसिन एपक’ युगात होते.
अमेरिकेतील शिकागोस्थित डी पॉल युनिव्हर्सिटीचे जीवाश्म संशोधक कॅशू शिमादा सांगतात की, सापडलेले जीवाश्म हे ‘ओटोडोनोटिडे’ नामक शार्क माशाच्या प्रजातीशी संबंधित आहे. या प्रजातीमध्ये लुप्त झालेल्या सुपर प्रिडेटर मेगालोडोन या मेगाटूथड् वंशाच्या शार्कचाही समावेश आहे. हे शार्क ओटोडोनटिडेच्या रूपात मेगालोडोन पॅराडॉक्सोडॉन मेगाटूथड् प्रजातीच्या जवळच्या नातेवाइकाचेच प्रतिनिधित्व करतात. या संशोधनाने सुमारे दोन कोटी वर्षांपूवी समुद्री जीव किती मोठे आणि घातक तसेच त्यांचे जीवन कसे होते? याची माहिती मिळण्यास मदत मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *