‘टाटा मोटर्स’ कामगारांना 27 हजार बोनस

येथील प्रसिद्ध टाटा मोटर्स कंपनीच्या कामगारांना अखेर 27 हजार रुपये बोनस दिला जाणार आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही रक्कम 3 हजारांने अधिक आहे. या करारावर कंपनी व्यवस्थापन आणि टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी उद्या सोमवारी (दि. 10) रोजी सह्या करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे कामगारांचा दसरा आणि दिवाळी गोड झाला आहे.

दिवाळीजवळ आल्याने युनियनने कंपनी व्यवस्थापनाकडे 50 ते 55 हजार रुपये एकूण बोनस देण्याची मागणी निवेदनाद्वारे 20 सप्टेंबरला केली होती. यासंदर्भात, युनियन पदाधिकारी आणि व्यवस्थापनांमध्ये बैठका होऊन चर्चा झाली. अखेर त्यावर एकमत होऊन 27 हजार रुपये   बोनस रक्कमेवर देण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. या संदर्भातील, करारावर उद्या सोमवारी म्हणजे खंडेनवमीच्या दिवशी सह्या होणार आहेत. त्यानंतर सायंकाळपर्यत सुमारे साडेचार हजार कामगारांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. दुसर्‍या दिवशी दसरा आहे. बोनस संदर्भात तोडगा निघाल्याने, कामगार वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. सुपर एन्यूएशन वर्गातील 500 कामगारांना 8 हजार रुपये आणि मूळ वेतनाच्या वार्षिक रकमेच्या 15 टक्के रकम असा उत्पादनाशी निगडीत रकम बोनस रूपात दिले जातो.

गेल्या वर्षी बोनसवरून वाद रंगला होता. दसर्‍यापर्यंत बोनस न दिला गेल्याने कामगारांनी उपोषण आंदोलन सुरू केले होते. अखेर व्यवस्थापनाने दिवाळीच्या तोंडावर परस्पर कामगारांच्या खात्यात

24 हजार रुपये बोनस जमा केला होता. त्यात 8 हजार 400 रुपये बोनस आणि 15 हजार 600 रुपये सानुग्रह अनुदान होते. दरम्यान, जमशेदपूर येथील कंपनीत वर्गवारीनुसार किमान 16 हजार 900 ते कमाल 38 हजार 150 रुपये बोनसची रक्कम निश्‍चित केले गेली. त्याप्रमाणे किमान 38 हजार रुपये बोनस मिळेल, अशी कामगारांना अपेक्षा होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *