एटीएम फोडणार्‍या तरुणाला रंगेहात अटक

 नालासोपारा पूर्वेत अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम फोडणार्‍या तरुणाला गस्तीवर असलेल्या तुळींज गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले. विकास दीपक सेन (23) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याने यापूर्वी अन्य कोणते एटीएम फोडले आहेत का, तसेच त्याचे अन्य कोणी साथीदार आहेत का, याचा तपास सुरू आहे.
नालासोपार्‍यात सर्वत्र नवरात्रीची धूम सुरू आहे. यावेळी कोणतीही अप्रिय घटना किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस सर्वत्र डोळ्यात तेल घालून गस्त घालत आहेत. काही ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी चालवली आहे. शनिवारी रात्री पूर्वेकडील डॉन लेन परिसरात अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम कोणीतरी फोडत असल्याचे गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिसले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता आरोपी विकास संपूर्ण एटीएम फोडून पैसे काढण्यात गुंतल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला ताबडतोब अटक करून त्याच्यावर विविध गुन्हे दाखल केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *