दिवा रेल्वे स्टेशन येथील जलदगती मार्गावरचे जुने रूळ कापून ते तीन नंबर स्थानक आणि चार नंबर स्थानक यांना जोडण्यासाठी तिसरा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. परंतु जलद गती मार्गाचे काम अजून बाकी असल्यामुळे चौथा मेगाब्लॉक देखील घेण्यात येणार आहे.
रविवारी तीन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला त्यामध्ये मध्य रेल्वेवर दिवा येथील जलद गती मार्गावरती जुने रूळ कापून ते सीएसटी आणि कल्याण दिशेकडे नवीन रुळांना जोडण्याचे काम रेल्वे कामगारांनी सुरु करून ते काम पूर्ण केले आहे परंतु जलदगती मार्गाचे आणखी अभियांत्रिकी कामे बाकी असल्यामुळे चौथा मेगाब्लॉक देखील घ्यावा लागणार आहे, त्यामुळे प्रवाशांना आणखी एक दिवस मेगाब्लॉकला सामोरे जावे लागणार आहे.
दिवा रेल्वे स्थानकामध्ये रविवारी सर्व लोकल पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत होत्या मुंबईकडून येणारी लोकल एक नंबर रेल्वे स्थानकावरती थांबत होती तर कर्जत, कसारा यावरून येणारी स्लो लोकल, जलद लोकल दोन नंबर स्थानकावरती थांबत होत्या त्यामुळे प्रवाशांची गर्दी उसळली होती परंतु लोकल गाड्या येणार्या आणि जाणार्या रेल्वे स्थानकावरती थांबत असल्यामुळे प्रवाशांचा प्रवास चांगला होत होता.
त्यामुळे तिसरा मेगाब्लॉक रेल्वेने घेऊन डाऊन जलद मार्गावरील जुने रूळ कापून ते सीएसटी आणि कल्याण दिशेकडील नवीन रुळांना जोडण्याचे काम हाती घेऊन काम पूर्ण केले आहे.
