श्रीनगर : पाम्पोर येथे दहशतवादी हल्ला

येथे असणाऱ्या जम्मू-काश्मीर उद्योजक विकास संस्थेच्या इमारतीवर (जेकेईडीआय) आज (सोमवार) सकाळी साडे सहाच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. २ ते ३ दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करत या इमारतीला आग लावल्याचे वृत्त आहे. यात एक  लष्कराचा जवान जखमी झाल्याचेही समजते आहे.

हे ठिकाण श्रीनगर पासून १० किलोमीटर लांब आहे.

या वर्षीच्या २० फेब्रुवारीला याच परिसरात दहशतवादी आणि भारतीय लष्कर यांच्यात चकमक झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *