राधिका म्हणते…

एका प्रमोशनल इव्हेंटदरम्यान तिच्या न्यूड सीनबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर अभिनेत्री राधिका आपटे भडकली आणि तिने तुमच्यासारखेच लोक वाद निर्माण करतात. तुम्ही ती क्लीप पाहिली असेल आणि इतरांनाही दाखवून शेअर केली असेल. तेव्हा तुम्हाला असा प्रश्‍न विचारण्याचा अधिकारच येत नाही. मी एक कलाकार आहे आणि चित्रपटासाठी जी गरज आहे. तसा अभिनय मी करणार. तुम्ही तुमच्या संकुचित मनोवृत्तीतून बाहेर येऊन चित्रपट पाहाल, तेव्हा जगभरातील अनेक अभिनेत्री अशाप्रकारचे सीन करत असल्याचे दिसेल. तेव्हा तुम्हाला असे प्रश्‍न विचारावे लागणार नाहीत. तसेच यावरून वाद निर्माण होणार नाहीत. मला माझे अंगप्रदर्शन करण्यात कसलीही लाज वाटत नाही. ज्यांना लाज वाटते तेच दुसर्‍याचे शरीर पाहण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळे तुम्हाला न्यूड सीन पाहण्याची इच्छा झाली, तर माझी ती क्लीप पाहण्याऐवजी स्वत: न्यूड होऊन आरशासमोर उभे राहा असा सल्ला देत या प्रश्‍न विचारणार्‍यांचा तिने समाचार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *