मुंढेवाडी (ता.पंढरपूर) येथील एका घराचे मातीचे छत कोसळून मातीच्या ढिगाखाली गुदमरून चौघांचा मृत्यू झाला. रविवारी मध्य रात्री घटना घडली. मृतामध्ये पती पत्नीसह दोन मुलांचा समावेश आहे. ही घटना घडली त्यावेळी चौघेही गाढ झोपेत होते. झोपेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
