हुडकेश्वर हद्दीतील रेणुका माता मंदिरसमोर, पॅराडाईज इमारतीच्या पहिल्या माळ्यावर कार्यालय थाटून येथून बीएएमएसची बोगस पदवी आणि अन्य प्रमाणपत्रे सहज तयार करून दिली जात होती. लोंढे नावाचा व्यक्ती मध्यस्थ म्हणून काम करीत होता. सावज हेरून तो रॅकेटच्या प्रमुखापर्यंत पोहोचवून देत होता. यानंतर डिल निश्चित व्हायची. याच कार्यालयातून महाराष्ट्र राज्य विज्ञान वैद्यकीय विद्यापीठ, नाशिकच्या नावाने नोंदणी व बनावट प्रमाणपत्रे तयार करून दिली जात होती. या ठिकाणी बोगस पदवी व कागदपत्रे मिळवून अनेक झोलाछाप डॉक्टरांनी व्यवसाय थाटून रुग्णांच्या जिवाशी खेळ चालविला असण्याची शक्यता आहे. हा धक्कादायक प्रकार पुढे येताच महारेणू आरोग्य विद्यापीठाच्या नागपूर येथील विभागीय कार्यालयाच्या मनीषा कोठेकर यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
डॉक्टरची बोगस पदवी देणारे रॅकेट
डॉक्टरच्या पदवीसह वैद्यकीय व्यवसाय थाटण्यासाठी लागणारी कागत्रपत्रे तयार करून देणारे रॅकेट उपराजधानीत सक्रिय असल्याची बाब उघडकीस आली आहे. वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणात हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी लोंढेसह त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
