पत्‍नीकडून जबरदस्‍ती : घेऊ शकता घटस्‍फोट

जर एखादी पत्‍नी आपल्‍या पतीवर त्‍याच्‍या आई वडीलांपासून दूर राहण्‍यास जबरदस्‍ती करत असेल तर पती तिच्‍यापासून घटस्‍फोट घेऊ शकतो, असा महत्त्‍वपूर्ण निर्णय सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिला आहे.
सर्वोच्‍च न्‍यायालयाने एका याचिकेत हा निर्णय दिला. या याचिकेत पत्‍नी पतीला आई वडीलांपासून वेगळे राहण्‍यासाठी धमकावत होती. यासाठी तिने आत्‍महत्‍येचाही प्रयत्‍न केला होता. पतीच्‍या चारित्र्‍यावरही तिने संशय घेतला. पण न्‍यायालयाने या प्रकाराला हिंसक प्रकार समजून घटस्‍फोटासाठी परवानगी दिली.
न्‍यायाधीश ए. आर. दिवे व एल. नागेश्‍वर यांच्‍या बेंचने दिलेल्‍या निर्णयात म्‍हटले आहे की, मुलाने आई वडिलांचा सांभाळ करणे ही भारतीय संस्‍कृती आहे. न्‍यायालयाने सांगितले की, सदर महिला पतीला त्‍याच्‍या आई वडीलांपासून विभक्‍त राहण्‍यासाठी जबरदस्‍ती करत होती. पण ही बाब चुकीची असल्‍याचे सांगून न्‍यायालयाने त्‍यांना घटस्‍फोटाची परवानगी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *