परग्रहावासियांचा शोध सुरू

चीनने जगातील सर्वात मोठी रेडिओ टेलेस्कोप बनवली असून ही टेलेस्कोप रविवारी दुपारपासून कार्यरत झाली आहे. या दुर्बिणीतून परग्रहावर कोठे सजीव सृष्टी आहे का याचा शोध घेण्यात येणार आहे. चीनच्या सामर्थ्याचे आणि प्रगतीचे प्रतीक म्हणून या दुर्बिणीकडे पाहिले जाते.
 या दुर्बिणेचे नाव ‘द फाईव्ह हंड्रेड मीटर ॲप्रेचर स्पेरिकल रेडिओ टेलेस्कोप (एफएएसटी) असे आहे. चीनच्या गुझाऊ या डोंगराळ प्रदेशात ही दुर्बिण उभारण्यात आली आहे.’ ही दुर्बिण उभारण्यासाठी १८० अब्ज डॉलर इतका खर्च आला आहे. या दुर्बिणीतील रिफ्लेक्टर प्रचंड म्हणजे ३० फुटबॉल मैदान व्यापतील इतके मोठे आहे.
 चीनने २०२० पर्यंत स्पेस स्टेशनची निर्मिती करून चंद्रावर मनुष्य पाठवण्याची तयारी चीन करत आहे.  चायनीज ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे डायरेक्टर जनरल वु झिनापिंग यांनी ही दुर्बिण अतीसंवेदनशिल असून आपल्या दीर्घिकेच्यापलिकडे सजीवसृष्टी आहे का याचा शोध घेता येईल.
 २०११ मध्ये या दुर्बिणीचे काम सुरू झाले. त्यानंतर फक्त पाच वर्षांत ही दुर्बिण प्रत्यक्षात कार्यरत ही झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *