खतरनाक सेल्फींची राणी

      तुम्हाला सेल्फी घ्यायला आवडते का? नक्कीच! पण सेल्फीचा हा प्रकार तुम्ही कधीच पाहिलेला नसणार. रशियातील २३ वर्षांची अंजेला निकोलाऊ या तरुणीने जगातील आतापर्यंतच्या सर्वात धोकादायक सेल्फी घेतल्या आहेत. अशा प्रकार सेल्फी घेणे जीवावर बेतू शकते याची जाणीव असूनही या तरुणीने या सेल्फी घेतल्या आहेत.
चीन, अमेरिका, हाँग काँग आणि मास्को येथील उंच इमारतींवरून, स्कायस्क्रॅपरच्या कडावरून अशा कितीतरी धोकादायक ठिकाणाहून या सेल्फी घेतल्या आहेत. जेथे सेल्फी घेणे शक्य नाही त्या ठिकाणी तिचा फोटोग्राफर इव्हान कुझ्नेटसोव्ह तिच्या सोबत असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *