बिहारचा ‘सिंघम’ लवकरच महाराष्‍ट्रात

 महाराष्‍ट्राचे असलेले व बिहारचे सिंघम म्‍हणून देशभरात प्रसिद्‍ध असलेले आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे लवकरच महाराष्‍ट्रात येणार आहेत. तीन वर्षासाठी त्‍यांची महाराष्‍ट्रात प्रतिनियुक्‍ती होणार आहे.
शिवदीप लांडे यांनी महाराष्‍ट्रात प्रतिनियुक्‍तीसाठी विनंती अर्ज केला होता. यानंतर मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेत अर्जाची प्रक्रिया वेगवान करण्‍याचे आदेश दिले होते.
लांडे हे सध्‍या बिहारच्‍या स्‍पेशल टास्‍क फोर्समध्‍ये अधीक्षक आहेत. त्‍यांनी नक्षलग्रस्‍त भागात केलेल्‍या धडक कारवायांमुळे बिहारमध्‍ये त्‍यांची सिंघम म्‍हणून ओळख आहे. शिवदीप लांडे हे २००६ च्‍या बॅचचे आयपीएस आहेत. विशेष म्‍हणजे ते महाराष्‍ट्राचे जलसंपदा राज्‍यमंत्री विजय शिवतारे यांचे जावई आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *