गुजरातमध्ये पाकची आणखी एक बोट पकडली

सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना बुधवारी गस्तीवर असताना गुजरातमधील कच्छ परिसरात पाकिस्तानी बोट सापडली असून, बोटीत नऊ पाकिस्तानी लोक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सीमा सुरक्षा दलाने या नऊ लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या लोकांकडून मासेमारीचे साहित्य मिळाले आहे; परंतु हे लोक मासेमारीसाठीच आले होते का, याची पडताळणी केली जात आहे.

सुरक्षा दलाने गेल्या काही दिवसांत पकडलेली पाकिस्तानची ही तिसरी बोट आहे. पहिल्यांदा गुजरात किनारपट्टीवर भारतीय तटरक्षक दलाने एक बोट पकडली होती.

त्यानंतर मंगळवारीही बीएसएफच्या जवानांना पंजाबच्या पठाणकोट सेक्टरमधील रावी नदीच्या किना-याजवळ पाकिस्तानची रिकामी बोट आढळून आली होती. या वृत्ताला बीएसएफच्या वरिष्ठ अधिका-यांनी दुजोरा दिला होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *