महाराष्ट्र शिक्षक सहकार संघटनेचे उपोषण सुरू

ना हरकत प्रमाणपत्र देण्यास विलंब होत असल्याविरोधात शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे. आंतरजिल्हा बदलीसाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. परजिल्ह्यात जाऊ इच्छिणार्‍या शिक्षकांना ना हरकत दाखल्याची गरज असून, हा दाखला देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठीच उपोषणास्त्र सोडण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात येऊ इच्छिणार्‍या शिक्षकांना तत्काळ रुजू करून  घेणे, आदिवासी भागातील बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. आंदोलनात संघटनेचे उपविभाग प्रमुख अविनाश जुमडे, जिल्हाध्यक्ष शरद बरमे, उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर कोकणे, सचिव संतोष मनसुटे, कार्याध्यक्ष श्रीकांत काटेलवार आदी सहभागी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *