तब्बल चार कोटी रुपयांची दुर्गामूर्ती

पूर्वेकडील अनेक राज्यांमध्ये विशेषतः बंगाल, आसाम, ओरिसामध्ये नवरात्रीत दुर्गापूजेचा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. महाराष्ट्रात गणेशोत्सवात जसे सार्वजनिक गणेश मंडप असतात तसेच तिकडे भव्य मंडप पाहायला मिळतात.
 त्रिपुरामध्येही दुर्गापूजेचा उत्सव भव्य स्वरूपात होतो. यावर्षी तर आगरतळ्यात सुमारे 10.5 फूट उंचीची दुर्गामूर्ती बनवण्यात आली असून, ती अमेरिकन डायमंडनी सजवली आहे. या मूर्तीवर सोन्याचीही सजावट आहे. लक्ष्मी, सरस्वती, गणेश आणि कार्तिकेयाच्या मूर्तीही सोन्याने सजवल्या आहेत. येथील दुर्गामूर्तीची सजावट सुमारे चार कोटी रुपयांची असल्याचे सांगितले जाते.
 ही मूर्ती बंगालमधील उत्तर चोवीस परगण्यातील इंद्रजित पोतदार यांनी बनवली आहे. शहरातील चतरा बंधू क्लबमध्ये ही मूर्ती स्थापन केली आहे. या मूर्तीच्या सुरक्षेसाठीही चोख व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस आणि सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर संपूर्ण मंडपावर आहे. या ठिकाणी एकूण 25 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तसेच 35 खासगी सुरक्षा कर्मचारीही आहेत. पोतदार यांनी यापूर्वी आगरतळ्यातीलच एका मंडळासाठी मोती जडवलेली मूर्ती बनवून दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *