मराठा आरक्षण : ‘वर्षा’वर सर्वपक्षीय बैठक

मराठा मोर्चांच्या पार्श्वभूमीवर मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वर्षा’वर बोलावलेली बैठक नुकताच पार पडली आहे. विविध पक्षांच्या नेत्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आहे. मराठा आरक्षणावर १३ रोजी उच्‍च न्‍यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार आहे. यासंदर्भात चर्चा करण्‍यात आली आहे. मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्‍मक आहे, अशी माहिती शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
या बैठकीला राष्ट्रवादी नेते अजित पवारही उपस्थित होते. तसेच शिवसेना विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, भाजप नेते विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचीही सर्वपक्षीय बैठकीला उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *