पावसाळ्यातील तापाची कणकण-सुरक्षितता

ताप

  • विषमज्वर, स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरिया यांसारखे ताप आणि काविळीसारखे खराब पाण्यातून पसरणारे आजार यात पचनशक्ती कमी होते, तसेच शरीराची ताकदही कमी होते व थकवा जाणवतो. डेंग्यू, मलेरिया आणि काविळीत यकृतही आजारी पडते. अशा वेळी यकृताला चालना देणाऱ्या दोडका, टोमॅटो, मुळा, कारले, बीट, ताक या पदार्थाचा समावेश आहारात असावा. हळद पूडही पदार्थामध्ये घालावी. या पदार्थाना आहारात स्थान दिल्याने उपयोग होत असला तरी त्यांचा अतिरेक मात्र नको.
  • ताप तसेच विषाणूजन्य वा जीवाणूजन्य संसर्गातही जवस उपयुक्त ठरते. त्यामुळे जवसाची चटणी आहारात द्यावी. मऊ भात वा खिचडीबरोबर ती खाता येईल.
  • थकवा दूर करून ताकद भरून येण्यासाठी आपण एरवी पेज, सूप ,डाळीचे पाणी हे देतोच. तसेच आमसुलाचे सार देता येईल. दर्जाळूचे सरबतही तापातील थकवा दूर करण्यासाठी मदत करते. जर्दाळू पाण्यात भिजवून हे सरबत करतात. खजुराचे वा गिलक्याचे (घोसाळ्याचे) सरबत करतात. घोसाळे या फळभाजीचे सरबत हे ऐकायला थोडे विचित्र वाटेल, परंतु कच्च्या घोसाळ्याचा रस काढून त्यात मीठ व साखर घालून नेहमीच्या सरबतासारखेच हे सरबत करतात.
  • अँटिबायोटिक औषधे सुरू असताना अनेकदा त्याच्या नंतर खायला सांगितलेले असते. अशा वेळी भाकरीच्या पिठात हळद, मीठ व ओवा घालून केलेली गरम भाकरी साजूक तुपाबरोबर खाता येईल.
  • डाळिंबाचे दाणे सतत थोडे थोडे खावेत. त्याने प्रतिकारशक्ती चांगली होते, जीवनसत्त्वे मिळतात आणि पित्त व बद्धकोष्ठही कमी होते.
  • मधल्या वेळी राजगिरा, ज्वारी अशा विविध प्रकारच्या लाह्य़ा, खाकरा असे हलके पदार्थ देता येतील. त्याने पचनशक्तीवर ताण येत नाही.kitak

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *