चांगले आरोग्य मिळवायचे असेल तर त्यासाठी चांगल्या आहाराची गरज असते. मात्र, आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना आहाराची पत्थ्य पाळणे शक्य होत नाही. तसेच आजच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बुद्धीही तल्लख असणे गरजेचे आहे.
योग्य आहार घेतल्यामुळे शरीर आणि बुद्धी यांचे काम योग्य प्रकारे चालते. आहारामध्ये पुढीलपैकी काही घटकांचा सामावेश केल्याने शरीर आणि बुद्धीचे संतुलन राखता येईल.
१. ब्रोकोली- मेंदुचे कार्य योग्य पद्धतीत चालण्यासाठी ब्रोकोलीचा आहारामध्ये वापर फायद्याचा असतो. कारण यामध्ये ‘कोलीन’ हा घटक आढळून येतो आणि कोलीन मेंदूमध्ये नव्या पेशी बनवण्याचे काम करतो.
२. बदाम- बदामाचा उपयोग स्मरणशक्ती वाढवण्यासाठी होतो. रोज मूठभर बदाम खाणे फायद्याचे ठरु शकते.
३. अंडे- आपणा सर्वांना माहित आहे की, अंडे खाणे शरीरासाठी चांगले असते परंतू अंड्याचे सेवन हे मेंदूच्या विकासासाठीही चांगले आहे.
४. मासे- माशांचे सेवन स्मरणशक्ती बळकट करण्यासाठी चांगले असते. त्यात ओमेगा-3 चा साठा असतो. ज्याने स्मरणशक्ती सुधारते.