सगळे गाढ झोपलेले अन् अचानक आरडाओरडा, नवले पुलाजवळ मध्यरात्री काय घडलं? पुण्यातील घटना

पुणे-बेंगळुरू महामार्गावर नन्हे परिसरात खासगी प्रवासी बसला आग लागून बस जळून खाक झाली. रविवारी मध्यरात्रीनंतर दोन वाजता ही घटना घडली, तेव्हा प्रवासी गाढ झोपेत होते. मात्र, चालकाने प्रसंगावधान दाखविल्याने मोठी दुर्घटना टाळली. पुणे-बेंगळुरू महामार्गावरून जाताना नन्हे येथील श्री स्वामी नारायण मंदिराजवळ चालत्या बसमधून अचानक धूर निघू लागला. चालकाने तातडीने हा प्रकार लक्षात आणून दिल्याने वाहकाने झोपेतील प्रवाशांना जागे केले. सर्व त्वरित बाहेर पडले अन् बसने पेट घेतला.

सिंहगड रस्ता अग्निशमन केंद्राचे प्रमुख प्रभाकर उमराटकर यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी त्वरित पोहोचून जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. या आगीत बस जळाली; परिसरात धूर पसरला होता. सर्व प्रवासी सुखरूप बचावले, अशी माहिती उमराटकर यांनी दिली.

शॉर्ट सर्किटमुळे आगीची शक्यता

आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. तांत्रिक बिघाड किंवा शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे प्राण वाचले, नाहीतर मोठा अनर्थ घडला असता. जर बस आणखी पुढे गेली असती तर काही करता आलं नसतं. आगीने एकदा रूद्र रूप धारण केल्यावर रोखणं सोपं नसतं. मात्र वेळेमध्ये सर्व अग्निशमक दलाचे कर्मचारी पोहोले आणि त्यांनी वेळेतच पाण्यचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे प्रवाशांसह सर्वांचे प्राण वाचले, मोठा अनर्थ टळला.

काही अंतरावरा मृत्यूचा सापळा

ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथून काही अंतरावरच मृत्यूचा सापळ म्हणून कायम चर्चेत राहणारा नवले पूल आहे. नवले पूलावरून काही अंतरावर स्वामी नारायण मंदिर आहे. नवीन बोगदा सोडल्यावर दरीपूल लागतो त्यानंतर उतरणीलाच हे स्वामी नारायण मंदिर आहे. नवले पूलावर अनेक विचित्र भीषण अपघात झालेले पाहिले आहेत. यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *