मुसळधार पाऊस सुरु असतानाच चिपळूण कराड मार्गावर पिंपळी येथे ट्रक, रिक्षा आणि थार गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अडीच वर्षीय चिमुरड्याचाही समावेश आहे. सोमवारी रात्री उशिरा दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
कसा झाला अपघात?
रिक्षा आणि थार एकमेकांना चुकवत असताना समोरुन येणाऱ्या ट्रकला आदळल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रिक्षा चालक पिंपळी परिसरातील असून लहान मुलासह तिघे जण प्रवास करत होते. या चौघांनाही प्राण गमवावे लागले. याशिवाय ट्रकवर गाडी आदळल्याने थार चालकाचाही जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की थार गाडी आणि रिक्षा यांचा चक्काचूर झाला.