कल्याणमध्ये लोहमार्ग पोलीस ठाण्यात पावसाचं पाणी शिरलं, लॉकअपमध्येही पाणी घुसलं

कल्याणमध्ये डोंबिवलीत सध्या पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. रात्रभर शहरात पाऊस पडला. तसेच सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली शहरांत आता सखल भागांत पाणी साचायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे पाऊस इतका वाढला की, कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात पाणी शिकलं. यामुळे पोलिसांचे दैनंदिन कामकाज अडथळ्यांत सापडले आहे. लोहमार्ग पोलिसांनी पंपाच्या मदतीने पाणी उपसण्याचे काम सुरू केलं आहे. मात्र पावसाचा जोर कायम असल्याने पोलीस तालुक्यातील स्वागत कक्ष असेल, आरोपीचे लॉकअप असेल या ठिकाणी देखील पाणी साचलं आहे. पोलिसांना या पाण्यात उभे राहून कामकाज करावे लागत आहे.

कल्याण पूर्वेतील नेतिवली टेकडी परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. नेतिवली टेकडीतील पोलीस ठाण्याच्या पाठी असलेल्या जय भवानी नगरमध्ये ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन ते तीन घरांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *