धक्कादायक घटना -तरुणीवर चाकूहल्ला

भररस्त्यात २२ वर्षीय तरुणीवर माथेफिरु तरुणाने ३० वेळा चाकूहल्ला करून हत्या केल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली. 

भररस्त्यात २२ वर्षीय तरुणीवर माथेफिरु तरुणाने ३० वेळा चाकूहल्ला करून हत्या केल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.

सुरेेंद्र असे या माथेफिरुचे नाव आहे. करुणा असे या पिडीत तरुणीचे नाव होते. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला.

दिल्लीतील बुराडी परिसरात राहणा-या पिडीत तरुणीवर हा माथेफिरू गेल्या काही महिन्यांपासून एकतर्फी प्रेम करत होता. सहा महिन्यांपूर्वी आदित्य मलिकविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल झाली होती. मात्र त्यानंतर दोन्ही बाजूंनी तडजोड झाली. मात्र त्याने पुन्हा तिला त्रास द्यायला सुरुवात केली.

बुराडीमधील रस्त्यावरुन पीडित तरुणी जात असताना आदित्यने तिच्यावर चाकूने हल्ला केला. आदित्यने तिला २१ वेळा चाकूने भोसकले.हल्ल्यानंतर मारेकरी आदित्य मलिक घटनास्थळावरुन पसार झाला. यामध्ये ती तरुणी गंभीर जखमी झाली. तिला सुश्रृषा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तोपर्यत तिचा मृत्यू झाला.

आदित्य तिच्यावर वार करत असताना तिथून अनेक पादचारी जात होते. पण कोणीही तिच्या मदतीला धावले नाही. मन सून्न करणारी ही घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे. समाजातल्या असंवेदनशीलेचे आणखी एक उदाहरण पुढे आले आहे. नागरिकांनी थोडीशी हिंमत दाखवली असती तर कदाचित तरुणीचा जीव वाचला असता, अशी संतप्त प्रतिक्रीया उमट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *