लग्नमंडपात नवऱ्यावर डिझेलचे कॅन ओतून जिवंत…; येवल्यातील हादरवणारी घटना; 7 ते 8 जण जखमी

लग्नाच्या मंडपात नव-यामुलासह त्याच्या नातेवाईकांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमविवाहाच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांनी हा हल्ला केला. येवला शहरातील एका लॉन्समध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. यावेळी झालेल्या हाणामारीत सात ते आठ जण जखमी झालेत. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून दोन्ही बाजूनं गुन्हा नोंदवला आहे.

येवल्यातील तरुणाचं निफाड तालुक्यातील तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. या दोघांनी पळून जाऊन नोंदणीकृत लग्न केलं. त्यानंतर मुलाच्या नातेवाईकांनी दोघांचा रितसर विवाह सोहळा आयोजित केला. मात्र प्रेम विवाहाचा राग मनात धरत मुलीच्या नातेवाईकांनी लग्न सोहळ्यात डिझेलचे कॅन ओतून नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. यात सात ते आठ जण जखमी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *