दिवाळीत गावी जाणाऱ्या प्रवाशांची लूट रोखण्यासाठी RTO चा मोठा निर्णय; खासगी बसचालकांना तिकिटाबाबत कडक नियम

दिवाळीत गावी जाणाऱ्या प्रवाशांची आर्थिक लूट रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) खासगी बसचालक आणि ऑनलाइन तिकीटविक्री करणाऱ्या कंपन्यांना सक्त इशारा दिला आहे. एसटी महामंडळाच्या संबंधित मार्गावरील नियमित तिकिटदराच्या दीडपटापेक्षा अधिक भाडे आकारता येणार नाही. प्रत्यक्ष बसमधून किंवा ऑनलाइन ॲप आणि संकेतस्थळांवरून निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक भाडे आकारल्याचे आढळल्यास संबंधित बसमालक आणि कंपन्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आरटीओकडून देण्यात आला आहे.

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. एसटी आणि रेल्वेचे आरक्षण आधीच पूर्ण झाल्याने प्रवाशांना खासगी बसचा आधार घ्यावा लागतो. या परिस्थितीचा फायदा घेऊन काही खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या तिकिटांचे दर दुप्पट ते तिप्पट वाढवत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *