ज्येष्ठ अभिनेत्री सुधा शिवपुरी यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री सुधा शिवपुरी यांचे निधन

‘क्योंकि सांस भी कभी बहू थी’ या मालिकेतून ‘बा’ म्हणून सर्वांना परिचित झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुधा शिवपुरी यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. त्या ७८ वर्षांच्या होत्या.

गेल्या दोन महिन्यांपासून त्या आजारी होत्या. मंगळवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

एकता कपूरच्या ‘क्योंकि सांस भी कभी बहू थी’ या मालिकेतून त्या ‘बा’ म्हणून घराघरात पोहोचल्या. यासोबत त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले. १९७७ मधील बासू चॅटर्जी यांच्या स्वामी या चित्रपटातून त्यांनी बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. तसेच इंसाफ का तराजू, हमारी बहू अलका, सावन को आने दो, सुन मेरी लैला, बर्निंग ट्रेन, विधाता आणि माया मेमसाब या अनेक चित्रपटांतून त्यांनी काम केले होते.

शीशे के घर, वक्त का दरिया, दामन, संतोषी मा, ये घर, कसम से, किस देश मे है मेरा दिल या मालिकेतही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. २००३ मध्ये आलेल्या ‘पिंजर’ या चित्रपटातही त्यांनी काम केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *