काबूलमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात ६ ठार , ४३ जखमी

काबूलमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात ६  ठार , ४३  जखमी

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये विविध दूतावासांच्या भागात मंगळवारी आत्मघातकी हल्ला झाला आहे. यामध्ये ६ जण ठार, ४३ जण जखमी झाले असून त्यांना विविध रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती पोलीस व आरोग्य खात्याच्या अधिका-यांनी दिली. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही.

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार न्याय आणि खाण मंत्रालयाजवळ हा बॉम्बस्फोट झाला. अनेक किलोमीटरपर्यंत या बॉम्बस्फोटाचा आवाज ऐकू आला. त्यावरुन या स्फोटाच्या तीव्रतेची कल्पना येते. स्फोटामुळे जवळच्या इमारतींच्या काचा फुटल्या आहेत.

काबूलच्या मध्यभागी हा स्फोट झाला असून, या भागात अनेक देशांच्या राजनैतिक अधिका-यांची निवासस्थाने आहेत. सुरक्षा पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहेत.

शनिवारी काबूलमधील एका नामांकित हॉटेलवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात चार भारतीयांसह चौदा जण ठार झाले होते. भारतीय राजदूताला लक्ष्य करण्याच्या इराद्याने हा हल्ला झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *