आयुष्यात एकदा तरी काश्मीरला भेट द्या-सलमान खान

आयुष्यात एकदा तरी काश्मीरला भेट द्या-सलमान खान

‘ज्यानं काश्मीर पाहिलं नाही, त्यानं काहीच पाहिलं नाही. काश्मीर हे पृथ्वीवरचं सगळ्यात सुंदर ठिकाण आहे. प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी काश्मीरला भेट द्यायलाच हवी,’ असं मत अभिनेता सलमान खान यानं व्यक्त केलंय.

‘हिट अँड रन’ प्रकरणात न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर सलमान ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाच्या शुटिंगासाठी काश्मीरमध्ये गेला होता. तेथील शुटिंग संपवल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सलमाननं काश्मीरच्या सौंदर्यावर तोंडभरून कौतुक केलं. ‘निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी आणि चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी स्वित्झर्लँडला जाणारे मूर्ख आहेत. निसर्गानं काश्मीरला भरभरून दान दिलं आहे. स्वित्झर्लंडची काश्मीरशी तुलना होऊ शकत नाही,’ असं सलमान म्हणाला.

‘काश्मिरी माणसं खूपच सभ्य, सुसंस्कृत, साधीभोळी व सुंदर आहेत. काश्मीरमध्ये ४० दिवस राहून मी याचा अनुभव घेतलाय. काश्मीरच्या मी प्रेमातच पडलोय. इतरांनीही या ठिकाणाला भेट द्यावी,’ असं आवाहनही त्यानं केलं. काश्मीरमधील सिनेमागृह पुन्हा सुरू व्हायला हवीत. तसं झाल्यास आम्ही चित्रपटांचे प्रिमीअर सोहळे इथं करू,’ असंही तो म्हणाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *