भारतात महिलांनी चुंबन घेतल्यास नेत्याची खुर्ची जाईल

भारतात महिलांनी चुंबन घेतल्यास नेत्याची खुर्ची जाईल

भारतात महिलांनी सार्वजनिक ठिकाणी एखाद्या नेत्याचे चुंबन घेतले तर त्यावरुन गदारोळ माजून त्या नेत्याची खुर्ची व निवडणुकीचे तिकीट या दोन्हींवर पाणी सोडावे लागेल असे बेताल विधान मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री बाबूलाल गौर यांनी केले आहे.
भोपाळमध्ये प्राकृतिक चिकीत्सा, योगा याविषयावर राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गौर यांनी आरोग्यावर बोलण्याऐवजी थेट रशियातील महिलांवर घसरले. मी रशिया दौ-यावर असताना तीन महिलांनी प्रेमाने मला मिठी मारली व माझ्या कपाळाचे चुंबन घेतले. रशियाच्या महिला शरीराने सुदृढ असतात अशी आठवण त्यांनी सांगितले. गौर यांचा हा किस्सा ऐकून उपस्थितही गोंधळून गेले होते. रशियात हे सर्व प्रकार आदरातिथ्याचा एक भाग असतो. भारतात असे झाले असते तर त्या नेत्याला खुर्ची सोडावी लागली असते असेही त्यांनी नमूद केले.
चुंबनाचा किस्सा थांबून गौर थांबले नाहीत. मग धोतराचा किस्सा सांगताना गौर म्हणाले, रशियातील एका नेत्याच्या पत्नीने मला धोतर कशी घालतात असा सवाल विचारला. यावर मी तिला म्हणालो धोतर कशी घालतात यापेक्षा ती कशी सोडवता येईल हे दाखवू शकतो. गौर यांचे हे बेताल विधान ऐकून उपस्थितांची अवस्था बिकटच झाली. मंत्री महाशयांच्या विधानावर हसावे की काय करावे असा प्रश्न सर्वांच्याच चेह-यावर दिसत होता. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी गौर यांच्या बेताल विधानांवर नाराजी व्यक्त केली. महिलांविषयी असे बेजबाबदार विधान करुन गौर यांनी त्यांची मानसिकता दाखवून दिली असे काँग्रेसने म्हटले आहे. गौर यांनी यापूर्वीही महिलांविषयी बेताल विधान केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *