आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या पर्वतरांगांमध्ये होत असलेल्या तुफान पावसामुळे आसामच्या दहा जिल्ह्यांमध्ये पुरानं थैमान घातलं आहे.
ब्रम्हपुत्रा नदीसह तिच्या उपनद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून १९२ गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर सुमारे ३ लाख ७६ हजार ६७२ हेक्टर जमीन पुरामुळे खराब झाली असून तब्बल ८५ हजार लोकांना या पुराचा फटका बसला आहे.
तिनसुकियामध्ये ३ मदत छावण्या उभारण्यात आल्या असून यामध्ये १९८ लोकांनी आश्रय घेतला आहे.
