एअर इंडियाचा मान्सून धमाका, 1777 रुपयांत हवाई सफर

एअर इंडियाचा मान्सून धमाका, 1777 रुपयांत हवाई सफर

सार्वजनिक क्षेत्रातील विमान कंपनी एअर इंडियानं भारतात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर दिलीय.

एअर इंडियानं कमीत कमी 1777 रुपयांत प्रवासाची संधी प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिलीय. मंगळवारी सादर करण्यात आलेली ही स्कीम सीमित वेळेसाठी आहे. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये सर्व करांचा समावेश आहे.

10 जून ते 12 जून दरम्यान ऑनलाईन, एअर इंडियाची वेबसाईट, टोल फ्री क्रमांक आणि अधिकृत एजंटसच्या माध्यमातून ही तिकीटे प्रवासी खरेदी करू शकतात, असं एअर इंडियानं जाहीर केलंय.

मॉन्सून सेलमध्ये सूट मिळालेल्या तिकीटांवर 1 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत प्रवासी प्रवास करू शकतात.

जुलै ते सप्टेंबर आणि जानेवारी ते मार्च हे महिने प्रवासासाठी सुस्त सीझन म्हणून ओळखले जातात. त्यामुळे एअर इंडियानं हे पाऊल उचललंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *