अकोल्यातला यशपाल पाकळचं यश सर्वांच्याच नजरेत भरणारं ठरलं आहे. यशपालला तब्बल 99.40 टक्के गुण मिळाले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करण्याचा मान यशपालच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
तर ‘Best of Five’ नुसार अकोल्याच्या ‘बाल शिवाजी’ शाळेचा धनंजय सहस्त्रबुद्धे हा देखील 99.40 टक्के घेऊन यशपाल पाकळ याच्यासह राज्यात प्रथम आला आहे.
तर दुसरीकडे कोल्हापुरातील ज्योती पाटीलनं जिद्दीच्या जोरावर काहीही साध्य करता येत हे दाखवून दिलं आहे.
विशेष म्हणजे ज्योतीचं हृदय केवळ 15 टक्केच काम करत असल्यानं तिनं आयसीयूमध्ये ही परीक्षा दिली आणि तब्बल 66.60 टक्के गुण मिळवले आहेत. वडिलांचं छत्र हरपल्यानं ज्योतीच्या घरची आर्थिक स्थिती बेताचीच आहे. ज्योतीला कॉमर्स शाखेत प्रवेश घ्यायचा आहे.
