मोगली आणि त्याचे जंगलातील मित्र यांची ‘थ्री-डी‘ धमाल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने ‘द जंगलबुक‘ हा भारतात शंभर कोटींहून अधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने पहिल्या दहा दिवसांत शंभर कोटींहून जास्त कमाई केली आहे.
पहिल्या आठवड्यानंतरही ‘द जंगलबुक‘ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली गल्ला जमवत आहे. शाहरूख खानचा ‘फॅन‘ मागील शुक्रवारी प्रदर्शित झाला. पण प्रेक्षकांनी ‘फॅन‘सोबतच ‘द जंगलबुक‘लाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘द जंगलबुक‘ गुढी पाडव्यादिवशी (8 एप्रिल) भारतासह जगभरात प्रदर्शित झाला. हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये तो प्रदर्शित करण्यात आला. प्रदर्शनानंतर पहिल्या दहा दिवसांत या चित्रपटाने 101 कोटी 82 लाख रुपयांची कमाई केली आहे.
प्रदर्शनानंतर दुसऱ्या आठवड्यातील शुक्रवारी जंगलबुकने 8 कोटी 2 लाख रुपये, शनिवारी 8 कोटी 51 लाख रुपयांचा, तर रविवारी 10 कोटी 68 लाख एवढा व्यवसाय केला. चित्रपट रसिकांनी सलग दोन आठवडे ‘द जंगलबुक‘ला भरघोस प्रतिसाद दिल्याने मोठी कमाई झाली.