श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दिलीप कुमार यांना शुक्रवारी अस्वस्थ वाटू लागल्याने लीलावती रुग्णालयात हलवण्यात आले होते.
रुग्णालय आणले तेव्हा त्यांना प्रचंड ताप होता. मात्र आता ताप उतरला आहे. ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत. मात्र अद्याप ते पूर्णपणे बरे होण्यासाठी काही कालावधी जाईल.
साधारणत: चार-पाच दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येईल, असे लीलावती रुग्णालयाचे डॉ. जलील पारकर यांनी सांगितले. दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून आणखी काही दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याचे त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी सांगितले.