एव्हरेस्टिंग मोहीम पूर्ण करणारा पहिला सायकलपटू

एव्हरेस्टिंग मोहीम पूर्ण करणारा पहिला सायकलपटू

अलिबाग- अलिबागचा सुमित सुदर्शन पाटील ‘एव्हरेस्टिंग’  ही साहसी सायकल मोहीम पूर्ण करणारा पहिला भारतीय सायकलपटू ठरला आहे. त्यामुळे त्याने या मोहिमेच्या हॉल ऑफ फेमच्या यादीत जाण्याचा मान मिळवला आहे. कारगील युद्धाच्या विजय दिवसाचे औचित्य साधून २६ जुलै २०१५ रोजी मनाली ते खारडूंगला हे अंतर पार करून जागतिक विक्रम करणार आहे.

या जागतिक विक्रमातून मिळणा-या निधीतून नेपाळमधील भूकंपग्रस्तांना सुमित मदत करणार आहे. तरुणांमध्ये साहसी वृत्ती निर्माण करण्यासाठी ही मोहीम आयोजित करण्यात आली आाहे. यात एव्हरेस्ट शिखराच्या उंचीएवढे म्हणजे ८८४८ मीटर उंचीचे अंतर न थांबता पूर्ण करायचे असते. यावेळी सायकलपटूंवर लक्ष ठेवण्यासाठी त्याच्या सायकलवर जीपीएस प्रणालीचा वापर केला जातो.  सुमित पाटील याने या मोहिमेसाठी अलिबाग तालुक्यातील काल्रेिखड येथील १.४ किमी अंतराचा चढाव निवडला होता. त्याने न थांबता ९४  लॅप मारले. आणि ८९८८ मीटर उंची सर केली. जी उंची एव्हरेस्ट शिखराच्या ८८४८ मीटरपेक्षा जास्त होती. ही मोहीम पूर्ण केल्यामुळे सुमित पाटीलचे नाव या मोहिमेच्या हॉल ऑफ फेमच्या यादीत नोंदविले गेले आहे.

टीम अग्नी हा त्याचा संघ आहे. त्याला रोट्री क्लब वरळी मुंबई यांचे सहकार्य आहे. हे दोघे जयपूर फूट प्रोजेक्टच्या प्रचाराचे काम करतात. यापूर्वी सुमितने दोन वेळा ट्रायथॉलनचे ऑिलपिक अंतर पूर्ण केले आहे. रेस अ‍ॅक्रॉस अमेरिका शर्यतीत तो सहभागी झाला होता. पुणे-गोवा हे ६४०  किमी अंतराची अल्ट्रा सायकल स्पर्धा त्याने पूर्ण केली आहे. येत्या जुलै महिन्यात मनाली ते खारडूंगला हे ५०० किमीचे जागतील सर्वात उंच कार रॅलीचा मार्ग कमी वेळात पूर्ण करून जागतिक विक्रम करण्याचा प्रयत्न सुमित करणार आहे.

२५ जुलै २०१५ रोजी मनाली येथून खारडूंगला जाण्यासाठी सायकल प्रवास सुरू करून २६ जुलै रोजी खारडूंगला कमीत कमी वेळात पोहोचून जागतिक विक्रम करून कारगील युद्धाचा विजयी दिवस साजरा करण्याचा सुमित पाटील प्रयत्न करणार आहे. जयपूर फूट प्रोजेक्टच्या अपात्रेकडून पात्रतेकडे या मोहिमेचा प्रचार करणार आहे. या जागतिक विक्रमातून मिळणा-या निधीतून नेपाळमधील भूकंपग्रस्तांना सुमित मदत करणार आहे. त्याच्या या मोहिमेला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *