उत्तर प्रदेश – येथील परादे बाजार परिसरात आज (शनिवार) पहाटे लागलेल्या भीषण आगीत एका बालकाचा मृत्यू झाला आहे.
आज पहाटे परादे बाजारातील 100 दुकानांना भीषण आग लागली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान आग लागल्यावर काही वेळातच अग्निशामक दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र अद्यापही आगीवर नियंत्रण मिळलेले नाही. आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे स्थानिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागणार आहे. घटनास्थळी पोलिसही दाखल झाले असून आगीच्या कारणांचा शोध घेण्यात येत आहे.