‘उच्च जाती’कडून दलित महिलांचं नग्न विडंबन

काही महिलांची नग्न धिंड काढून त्यांना मारहाण केली जात असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय.

हा व्हिडिओ अत्यंत क्लेशकारक आणि अपमानजनक असल्यानं इथं तो न दाखवण्याचा निर्णय  घेतलाय.

व्हिडिओच्या नावावरून काही उच्च जातीच्या महिला आणि पुरुषांकडून दलित महिलांचा हा छळ सुरू असल्याचं समजतंय. यात दोन नग्न महिला पाण्यात पडलेल्या दिसत आहेत… तर काही महिला त्यांना पाण्यात ढकलत मारहाण करताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ नक्की कुठला आहे आणि या दलित महिलांना ही मारहाण करण्यात आली याबद्दलचा कुठलाही तपशील अजून मिळालेला नाही. परंतु, मानवतेला पायदळी तुडवण्याचं दृश्यं या व्हिडिओतून स्पष्टपणे दिसतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *