आम्हाला भेटू दिले नाही अरुणाचा नातेवाईकांचा आरोप

आम्हाला भेटू दिले नाही अरुणाचा नातेवाईकांचा आरोप

अरुणा शानबाग यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त वर्तमानपत्रात आणि टीव्हीवर समजले, तेव्हा आम्ही त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाला अरुणा यांना भेटू दिले नाही, असा आरोप त्यांचे नातू वैकुंठ नायक नायक व भाची मंगल नायक यांनी केला.

अरुणा शानबाग यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या मोजक्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. त्यामध्ये अरुणा यांचे नातू वैकुंठ, भाचा विनायक नायक, भाची मंगल नायक यांनी हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते. त्यांनी अरुणा यांचे अत्यंदर्शन घेतले, तेव्हा त्यांनाही रडू कोसळले. पण हॉस्पिटलने आम्हाला यापूर्वी अरुणा यांना भेटू दिले नाही, असा आरोप मंगल नायक व वैकुंठ नायक यांनी केला. आम्ही अरुणा यांच्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप आमच्यावर केला जातो, पण त्यांच्या उपचारांचा खर्च आम्हाला परवडलाही नसता. मात्र २०११मध्ये आम्ही अरुणा यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. पण आम्हाला भेटू दिले नाही. आताही तीन दिवसांपूर्वी आम्ही त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. अरुणा यांना आयसीयूमध्ये दाखल केल्याचे वृत्त समजल्यावर आम्ही पुन्हा हॉस्पिटलला भेट दिली. पण तेव्हाही आम्हाला भेटू दिले नाही, असा दावाही त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *