तुम्ही शीतपेय (सॉफ्टड्रिंक) चे नियमित सेवन करता का? तुम्हाला त्याची सवय झाली आहे का? पण थांबा त्याचे अतिसेवन करु नका. त्यामुळे तुमच्या जिवावर बेतन्याची शक्यता आहे.
अल्कोहोलपेक्षा शीतपेय अधिक घातक असल्याचे लक्षात आले आहे. अमेरिकेतील संशोधनाला इंडियन मेडिकल काऊंसिलच्या अहवालानेही दुजोरा दिला आहे.
अमेरिकेतील एका विद्यापीठाच्या संशोधनानुसार, शीतपेयाचे अतिसेवन केल्याने रक्तात साखरेचे प्रमाण जास्त होते व रोग प्रतिकार क्षमता कमी होऊ लागते असे सांगण्यात आले आहे.
वर्षभरात मधुमेहाच्या तुलनेने तब्बल दीड लाख लोकांचा शीत पेयाचे अती प्रमाणात सेवन केल्याने मृत्यू होतो तर ४५ हजार लोकांचा ह्रदय विकाराने व सहा हजार ५०० लोक कर्करोगामुळे मृत्यू होतो.