चालकाचा ताबा सुटला, कार थेट कालव्यात कोसळली, पती-पत्नीसह तरुण बेपत्ता; छ.संभाजीनगरमध्ये मध्यरात्री काय घडलं?

जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील चांगतपुरी गावाजवळ काल रात्री एक भीषण अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट उजव्या कालव्यात कोसळली. या दुर्घटनेत कारमधील पती-पत्नीसह त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेला स्थानिक तरुण असे तिघेजण बेपत्ता झाले आहेत. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून पोलिसांकडून शोधकार्य सुरू आहेत.

नेमकं काय घडलं?

कारमधील मुखीद शेख आणि निलोफर मुखीद शेख (रा. कोरडगाव, ता. शेवगाव) हे प्रवासी तर रावसाहेब खडेकर असं बचावकार्यासाठी पाण्यात उतरलेला स्थानिक बेपत्ता तरुणाचं नाव आहे. दरम्यान, या प्रकरणी स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल सोमवारी रात्री 11 ते 11:30च्या सुमारास अलताफ पठाण हे आपली स्विफ्ट कार एमएच 12 केजे 9032 घेऊन जात होते. कारमध्ये त्यांच्यासोबत मुखीद शेख आणि त्यांच्या पत्नी निलोफर मुखीद शेख हे प्रवास करत होते. चांगतपुरी गावाजवळील कालव्याच्या पुलाजवळ चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने कार थेट पाण्यात कोसळली.

जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील चांगतपुरी गावाजवळ काल रात्री एक भीषण अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट उजव्या कालव्यात कोसळली. या दुर्घटनेत कारमधील पती-पत्नीसह त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेला स्थानिक तरुण असे तिघेजण बेपत्ता झाले आहेत. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून पोलिसांकडून शोधकार्य सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *